पाणी वापर….

“अहो काका, हे काय हो. इतके पाणी कोणी झाडांना घालतात का?” शेजारील काकांना बगीच्यात झाडांना पाईपाने पाणी घालतांना टुटुने पाहिले व तो न राहवून त्यांना बोललाच.

काका मात्र यामुळे खूप नाराज झाल्याचे टुटुला त्यांच्या चेहर्राचे निरिक्षण केल्यानंतर समजले. लालेलाल झालेला तो चेहरा. टुटु मात्र जागेवरून हलला नाही.

आता काका चिडले. त्यांनी पाईप जमीनीवर आपटला आणि फाटका जवळ येऊन म्हणाले,”काय रे. जास्त शहाणपण सूचते का तुला.”

“नाही हो काका. मी किती लहान. तुम्ही किती मोठे. मी शहाणा कसा असू शकतो.”

“मग का बडबडत आहेस.”

“काका, मला ते वाया जात असलेले पाणी पाहून त्रास होतो आहे म्हणून मी बोललो इतकंच.”

“बस इतकंच. काहीच कसं वाटत नाही रे तुला. मोठ्या माणसाशी अस बोलतोस.”

“ते पाणी….”

“परत तेच. अरे आजचा पेपर वाचला का तू. नसेलच वाचला. पेपर वाचायला शिकविलेच नसेल न तुला. माहिती आहे का तुला? राज्यातील धरणांमध्ये दुप्पट पाणी साठा असल्याची बातमी आली आहे वर्तमानपत्रात. आता यंदा पाणी टंचाई नाही.”

“मग….”

“मग काय, पाणी वाचवायची काय गरज आहे? विनाकारण माझा वेळ वाया घालवतोय.” काका चिडलेच.

एव्हाना शेजारीपाजारी जमा होऊन गम्मत बघू लागले. टुटुचे आई बाबा ही बाहेर आले. आईला चिंता वाटत होती. पण बाबा नेहमी प्रमाणे निश्चिंत होते. त्यांना टुटु वर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

टुटु म्हणाला, “ते बरोबर आहे काका. मी पण वाचली बातमी. पण आपण आणखी एक बातमी वाचली का??”

“???”काका त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिले. काकाच कशाला सर्वच जण उत्सुकतेने बघत होते.

टुटु,”अहो काका, शेवटच्या पानावर छोटीसी बातमी आहे. आपले येथील धरण भरल्याने २०० किमी वर याच पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरासाठी मुबलक पाणी सोडता येईल व तेथील पाणी प्रश्न सुटेल.”

“मी नाही वाचली ही बातमी.”

“मी पण नाही वाचली बुवा.”टुटु चे बाबा उदगारले.

“आणखी एक जर आपण पाणी बचत केली तर पुढच्या वर्षी पावसाळा सुरू होईल तेव्हा धरणामध्ये मोठा पाणी साठा शिल्लक राहील. याने काय होईल कि पाऊस कमी आला तरी धरण लवकर भरेल व पाणी सोडावे लागेल. ते सोडलेले पाणी नदीमधून वाहत खाली जाईल. तेथे ते धरणात साठेल व त्या परिसरातील शेती, उद्योग व पिण्यासाठी कामी येईल. बरोबर आहे ना

बाळा बरोबर बोलत आहेस. तुझं म्हणणं मला मान्य आहे.

आतापासूनच मी कानाला खडा लावतो. मग तर झालं!

तस नाही हो काका. झाडे मेलेली कशी चालतील. ती तर जीवंत राहायलाच हवीत. त्यांना गरजे प्रमाणे पाणी द्यायला हवे की.

बर बाबा. आता मी मगाने पाणी देत जाणार माझ्या झाडांना.

हे कसं काका. ती बघा झाडे ही खुश झालेली दिसत आहेत.

आणि सर्वांनी टाळ्या वाजवून टूटूचे कौतुक केले.

Posted in Uncategorized | पाणी वापर…. वर टिप्पण्या बंद

वर्तमानपत्र….

आज सकाळी सकाळी टुटु शेजारच्या काकुंकडे आईने दिलेला खाऊ घेऊन गेला होता. मोठ्या काकांनी दार उघडले व टुटु घरात गेला. काकूंना किचनमध्ये जाऊन खाऊ दिला.

“आईने सर्वांना थोडे थोडे द्यायला सांगितले आहे काकू.” असा निरोप ही दिला.

काकू ही “बर” अस म्हणाल्या.

आणि “तू बस हॉलमध्ये मी इडल्या केल्या आहेत त्या देते.” असे ही प्रेमाने म्हणाल्या. म्हणून तो हॉलमध्ये आला तर तीन्ही काका आपसात भांडत होते. का तर प्रत्येकाला पेपर हवा होता. अहो, पेपर म्हणजे वर्तमानपत्र. त्यात मोठ्या काकांचा मुलगा आणि मुलगी ही शामिल झाले. त्यांची ही भांडणं बघून टुटुला मजा येत होती. हळूहळू भांडण वाढत गेले. आता टुटु उठला आणि “काय झाले तुम्हा महानुभावांना भांडायला. असे काय विपरित घडले?” असे हावभाव करून बूजूर्ग म्हातारे बाबा विचारताहेत अशा आवेशात विचारले. ते सर्व त्याला त्याच्यातील गुणांना ओळखून होते. म्हणून सर्व एकदम थांबले.

मोठ्या काकांचा मुलगा म्हणाला, “हे बघ टुटु, आमच्या घरी एकच वर्तमानपत्र येते. प्रत्येकाला ते हवे असते. रोज आमची अशीच भांडणं होत असतात.”

टुटु” मग वेगवेगळे वर्तमानपत्र का नाही मागवत.”

“अरे बाबा नाही म्हणतात. तुझ्या सारखेच आहे पर्यावरणवादी. ते म्हणतात कागद बनवायला किती झाडांची कत्तल केली जाते. म्हणून एकच वर्तमानपत्र येणार घरी.”

“हो, त्यांचे बरोबर आहे. पण मग तुम्ही इंटरनेट वर वाचू शकता न बातम्या.” टुटुने सूचविले.

“अरे आम्ही ते करून पाहिले. पण वर्तमानपत्र वाचणे वेगळेच असते.”

“हो बरोबर आहे तुमचं.”

सर्व शांत असतात. अचान

क टुटु ओरडतो. “सापडले”

“अरे काय सापडले.”

“उत्तर. हे वर्तमानपत्र एक आणि एकाच वेळी वाचणारे पांच जणं. बरोबर!!”

“हो बरोबर.”

“मग मला सांगा प्रत्येकाला एकाच विषयात रस आहे का? अर्थात सर्वांना राजकारण वाचायचे असते का?”

“अरे नाही. प्रत्येकाची आवड वेगळी आहे.”

“मग तर काम सोपं झालं.”

“मला माहिती आहे तूला काय म्हणायचे आहे ते. तू प्रत्येक पान वेगळे….”

“हो हो तेच सांगत होतो मी. प्रत्येकाच्या आवडीनुसार पाने फाडून वेगळी करायची. अग ताई तू तर माझ्या सारखीच हुशार आहेस.”

“अरे पण बाबांना फाडलेला टूकडे टूकडे झालेला पेपर नको असतो.”

“अग मग त्यात काय एव्हढे. परत पेपर चिपकवून टाकायचा.”

“अरे एव्हढा वेळ कुठे आहे यांच्या कडे?”

“ताई, तूला सुटी आहे तोपर्यंत तू कर की हे काम. मी येत जाईल मदतीला.”

“नंतरचे काय..”

“नंतरचे नंतर बघू.”

सर्वांना हा निर्णय मान्य झाला व दुसऱ्या दिवसापासून अंमलबजावणी करण्याचे ठरले.

“टुटु तू फार हुशार आहेस. बघ न. आता हा सल्ला म्हणजे बाबांच्या आदेशाचे पालन झाले, सर्वांना एकाचवेळी वाचण्याचा आनंद मिळणार आणि पर्यावरणाचे संरक्षण ही झाले. पण पेपरचा खप कमी झाला न. नाही तरी तो होतच होता.” सर्वात मोठ्या दादाने टुटुचे मन भरून कौतुक केले.

http://www.mazyamana.wordpress.com

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

गोंधळून जाणे…(२११९४१)

टुटु रस्त्याने जात होता. मागून कोणीतरी थांब थांब पडशील. असे ओरडले आणि तो समोरच्या खड्ड्यात पडता पडता वाचला. मागून त्याच्या शेजारी राहणारे माधव काका येत होते. टुटु दुकानात सामान घेण्यासाठी जात होता. तो विचारमग्न होता. पण सावधपणे चालत होता. त्याच्या अगदी समोर एक खड्डा खोदलेला होता. माधवकाकांना वाटले टुटु आपल्या दुनियेत मग्न आहे. म्हणून त्याला सावध करावे अन्यथा तो खड्ड्यात पडेल. म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला.

काका जवळ येऊन थांबले. काय बाळा रस्त्याने चालतांना सावध राहावे. मी आवाज दिला नसता तर पडला असता न खड्ड्यात.

नाही हो काका, माझं लक्ष होतं. आणि असतं ही. मी नेहमी सावध असतो. चालतांना जरी विचार मनात येत असले तरी नजर सावध असते आणि लक्ष असतं. मला माहित होते समोर खड्डा आहे ते. पण तुम्ही हाक दिल्याने मी खड्ड्यात पडता पडता वाचलो. अहो काका, असे एखाद्या ला त्याचे लक्ष नसताना आवाज दिला तर त्याचे लक्ष विकेंद्रित होऊन तो गोंधळून जातो. याने अपघात पण होतात.

चल काही तरी काय बोलतोस.

आता हे बघा न काका.

एक वाहनचालक वाहन चालवित आहे. तो गाडी चालविण्याच्या तंद्रीत असणार. नेमके त्याच वेळी गाडी तील कोणी अचानक ओरडले, “अहो काका!” तर त्याचे लक्ष विचलित होणार कि नाही? इतकेच काय तो नेमके काय करावे ब्रेक दाबावे कि एक्सलरेटर! हेच मुळी विसरणार. बरोबर आहे का?

आता दुसरे उदाहरण बघा. अचानक गाडी च्या डाव्या बाजूला रस्त्यावर उभी असलेली व्यक्ती ओरडले तर वाहनचालक गोंधळेल कि नाही?

हो रे. बरोबर म्हणतोय तू. मी आता लक्षात ठेवणार बघ.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रकृति चा पहिला नियम: जर शेतात आपण बीयाणे नाही टाकले तर प्रक्रुति त्या शेतीला गवताने माखून टाकते..!!
त्याच प्रमाणे जर आपण आपले डोके “सकारात्मक” विचारांनी नाही भरले तर “नकारात्मक” विचार ती जागा व्यापून टाकतात.
🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

http://www.mazyamana.wordpress.com

🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

Posted in Uncategorized | गोंधळून जाणे…(२११९४१) वर टिप्पण्या बंद

खेळ आणि व्यायाम(२०१९४०)

टुटु आपल्या मित्रांसोबत लंगडी लंगडी हा खेळ खेळत होता. त्याने युट्युबवर हा पाहिला व तो मित्रांसोबत खेळण्याचे ठरवले. खरे म्हणजे त्याच्या आईने ते लहानपणी हा खेळ खेळत असल्याचे त्याला सांगितले होते. हा खेळ मुलं किंवा मुली कोणी ही खेळू शकते. त्याला आईने सांगितले तेव्हा पासून उत्सुकता लागून राहिली होती. म्हणून त्याने युट्युबवर सर्च केल्यावर लिंक मिळाली. त्याला खूप आनंद झाला तो खेळ पाहून. त्याने एक दोघांना दाखवला मोबाईल मधे. मग त्यांनी हा खेळ खेळायचे ठरवले.

(फोटो:गुगलवरून)

अचानक तेथे राहुलचे वडील आले व ओरडले. हा जूनाट खेळ कशाला खेळताय ते तुम्ही. किती जूना आहे हा. आता दुसऱ्या सोसायटी मधील मुलं बघतील तर काय म्हणतील?

टुटु खेळत राहिला पण राहुल थांबला. मग टुटु काकांजवळ गेळा. काका म्हणाले टुटु, अरे मोबाईलवर इतके नवीन नवीन गेम येत असतात ते खेळा की. या २१व्या शतकात हे एकोणिसाव्या शतकातील खेळ खेळून काय उपयोग?

टुटु म्हणाला, हो काका, तुमचं बरोबर आहे. आधुनिक जगात असं मागास राहणे काही योग्य नाही.

तेच म्हणतो मी.

काका हा राहुल आहे न बघा हो थोडासा खेळला कि थकून जातो.

अरे हो रे, तो काय खातो आणि बसतो. काही काम करत नाही बघ. म्हणून ही परिस्थिती. शरीराला काही व्यायाम हवा कि नको!

तेच म्हणतो मी काका. शरीराला व्यायाम हवाच. म्हणून लंगडी हा उत्तम खेळ आहे.

टुटु लगेच वळला व सर्व मुलांना चला खेळा रे म्हणाला.

काका बिचारे हतबल झाले. त्यांना काही सुचेना. शेवटी टुटु ला ओरडून म्हणाला. बाळा माझे चुकले रे. जूनेच खे। योग्य आहेत. नियमित शारीरिक व्यायाम होतो आणि त्यातून आनंद ही मिळतो, मन प्रसन्न राहते. खेळा मनसोक्त आता.

आणि ते तेथून निघून गेले.
🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

http://www.koshtirn.wordpress.com

🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

Posted in अनुभव, प्रबोधन | Tagged | 2 प्रतिक्रिया

छोटीसी चुक..(१९१९३९)

टुटु चे बाबा आज ऑफिस मधे गेले नाही म्हणून तो आनंदी होता आणि टेंशन मधे ही होता. आनंदी होण्याचे कारण म्हणजे आज निश्चितच बाबा काही तरी खाऊ आणतील याची खात्री. ते रजेवर असतात तेव्हा हमखास आवडीचा खाऊ आणतात. टेंशन याचे होते कि टुटु ला शाळेला सुटी होती व हे घरी म्हटले कि अधूनमधून त्याच्यावर राग काढणार.

असो, त्याने आईला कारण विचारले तेव्हा कळले उद्या कुठला तरी सण असल्याने सुटी आहे. कंटाळा आला म्हणून त्यांनी आजची सुद्धा रजा घेतली.

बाबा उठले तेव्हा ८.३० वाजले होते. आईने त्यांना काही तरी आणायची आठवण करून दिली. ते लगेच तयार झाले व टुटु ला तयार व्हायला सांगितले. तो ही तयार झाला व एक्टिवावर दोघे निघाले. बाबांनी त्याला अजूनही काही कल्पना दिली नव्हती ते कुठे निघाले आहे त्याची.

गाडी एका ठेल्यावर थांबली. याचा प्रत्येक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बाबांना येथील समोसे व वडे खूप आवडतात. त्यांनी ऑर्डर दिली व गप्पा मारत उभे होते.

अचानक त्यांच्या जवळ धडधड आवाज होऊन एक गाडी समोरच्या गाड्यांवर आदळून पडली. अगदी २ – ४ सेकंदात ही घटना घडली. सर्व सैरावैरा धावत सुटले. त्या गाडीसोबत एक काका व त्यांचा मुलगा खाली पडले. पडतांना मुलाला त्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता सैलसर पण अतिशय घट्ट मिठीत आवळून घेतले होते. त्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित होता. सर्वांनी त्यांचे तोंड भरून भरून कौतुक केले. पण त्या काकांना मार लागला होता. रक्त ही निघाले होते व मुका मार ही लागला होता.

त्यांना लोकांनी मदत करून बाजूला बसविले. थोड्या वेळाने ते काका म्हणाले अहो मी गाडी पार्किंग मधे लावण्यासाठी उभा होतो. म्हणून गाडी सुरू होती. समोरची एक गाडी बाहेर काढत असल्याने माझे त्यांच्या कडे लक्ष होते. तितक्या वेळात याने एक्सलरेटर फिरवला.

सर्वांच्या लक्षात आले काय झाले ते. म्हणून सर्वांनी त्यांना बोलायला म्हणजे डोज पाजायला सुरुवात केली.

टुटु मात्र पुढे झाला व सर्वांना शांत होण्याची विनंती केली. त्याचे बाबा त्याच्या कडे बघतच राहिले.

अहो, ही त्यांची चुक आहे हे बरोबर आहे पण अशी चुक कोणाकडून ही होऊ शकते. खरे म्हणजे त्यांनी या बाळाला पुढे बसवायला नको होते. त्या लहान बाळाला कसे कळणार तो काय करतोय ते. पण तो बाळ इतका छोटा आहे कि त्याला मागच्या सिटवर सुद्धा बसवता येत नाही. यावर सर्व अवाक होऊन टुटु कडे पाहत राहिले. अहो काका बघु नका काहीतरी उपाय आहे का सांगा. एका ने पटकन सांगितले गळ्यात टांगायची एक विशिष्ट प्रकारची पिशवी असते. त्यात लहान मुलांना छातीला कवटाळून घेता येते. त्याचे तोंड आपल्या कडे असल्याने एक्सलरेटर फिरवायचा प्रश्न उदभवत नाही.

(फोटो: गुगल)

आणखी एक पिशवी असते . ती पाठीमागे लटकवतात. त्यात बाळाला बसवले जाते. विशेष म्हणजे बाळाचे तोंड समोर किंवा उलट्या दिशेला दोन्ही कडे करता येते. सर्वांनी त्याचे कौतुक केले व सर्वांना टुटुने शपथ घ्यायला ही भाग पाडले.

(फोटो: गुगल)

घरी आल्यावर त्याच्या बाबांनी तोंड भरून भरून त्याचे कौतुक केले. आईने सुद्धा. लगेच संध्याकाळी सोसायटी मधील मंडळी एकत्र आली व टुटु चे कौतुक करून त्याला आठवण म्हणून एक भेटवस्तू ही दिली. तो नाही नाही म्हणाला पण कोणी ही ऐकायला तयार नव्हते.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

बाईकस्वार बाबा…..(१८१९३८)

टुटु चे बाबा आज ऑफिस मधे गेले नाही म्हणून तो आनंदी होता आणि टेंशन मधे ही होता. आनंदी होण्याचे कारण म्हणजे आज निश्चितच बाबा काही तरी खाऊ आणतील याची खात्री. ते रजेवर असतात तेव्हा हमखास आवडीचा खाऊ आणतात. टेंशन याचे होते कि टुटु ला शाळेला सुटी होती व हे घरी म्हटले कि अधूनमधून त्याच्यावर राग काढणार.

असो, त्याने आईला कारण विचारले तेव्हा कळले उद्या कुठला तरी सण असल्याने सुटी आहे. कंटाळा आला म्हणून त्यांनी आज ची सुद्धा रजा घेतली.

बाबा उठले तेव्हा ८.३० वाजले होते. आईने त्यांना काही तरी आणायची आठवण करून दिली. ते लगेच तयार झाले व टुटु ला तयार व्हायला सांगितले. तो ही तयार झाला व एक्टिवावर दोघे निघाले. बाबांनी त्याला अजूनही काही कल्पना दिली नव्हती.

गाडी एका ठेल्यावर थांबली. याचा प्रत्येक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बाबांना येथील समोसे व वडे खूप आवडतात. त्यांनी ऑर्डर दिली व गप्पा मारत उभे होते.

अचानक त्यांच्या जवळ धडधड आवाज होऊन एक गाडी समोरच्या गाड्यांवर आदळून पडली. अगदी २ – ४ सेकंदात ही घटना घडली. सर्व सैरावैरा धावत सुटले. त्या गाडीसोबत एक काका क्षव त्यांचा मुलगा खाली पडले. मुलाला त्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता सैलसर पण अतिशय घट्ट मिठीत आवळून घेतले होते. त्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित होता. सर्वांनी त्यांचे तोंड भरून भरून कौतुक केले. पण त्या काकांना मार लागला होता. रक्त ही निघाले व मुका मार ही लागला.

त्यांना लोकांनी मदत करून बाजूला बसविले. थोड्या वेळाने ते काका म्हणाले अहो मी गाडी पार्किंग मधे लावण्यासाठी उभा होतो. म्हणून गाडी सुरू होती. समोरची एक गाडी बाहेर काढत असल्याने माझे त्यांच्या कडे लक्ष होते. तितक्या वेळात याने एक्सलरेटर फिरवला.

सर्वांच्या लक्षात आले काय झाले ते. म्हणून सर्वांनी त्यांना बोलायला म्हणजे डोस द्यायला सुरुवात केली.

टुटु मात्र पुढे झाला व सर्वांना शांत होण्याची विनंती केली. त्याचे बाबा त्याच्या कडे बघतच राहिले.

अहो, ही त्यांची चुक आहे हे बरोबर आहे पण अशी चुक कोणाकडून ही ओऊ शकते. खरे म्हणजे त्यांनी या बाळाला पुढे बसवायला नको होते. त्या लहान बाळाला कसे कळणार तो काय करतोय हे. पण तो बाळ इतका छोटा आहे कि त्याला मागच्या सिटवर सुद्धा बसवता येत नाही. यावर सर्व अवाक होऊन टुटु कडे पाहत राहिले. अहो काका बघु नका काहीतरी उपाय आहे का सांगा. एका ने पटकन सांगितले गळ्यात टांगायची एक विशिष्ट प्रकारची पिशवी असते. त्यात लहान मुलांना छाती ला कवटाळून घेता येते. त्याचे तोंड आपल्या कडे असल्याने एक्सलरेटर फिरवायचा प्रश्न उदभवत नाही. सर्वांनी त्यांचे कौतुक केले व सर्वांना टुटुने शपथ घ्यायला भाग पाडले.

घरी आल्यावर त्याच्या बाबांनी तोंड भरून भरून त्याचे कौतुक केले. आईने सुद्धा. लगेच संध्याकाळी सोसायटी मधील मंडळी एकत्र आली व टुटु चे कौतुक करून त्याला आठवण म्हणून एक भेटवस्तू ही दिली. तो नाही नाही म्हणाला पण कोणी ही ऐकायला तयार नव्हते.

असा हा टुटु सर्वांचा मित्र झाला आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.mazyamana.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Posted in अनुभव, प्रबोधन | Tagged | बाईकस्वार बाबा…..(१८१९३८) वर टिप्पण्या बंद

बस टिकिट….(१७१९३७)

“हे बघ टुटु, तूझ्यामुळे मी बराच बदल केला आहे स्वतः मधे. तू माझ्या पेक्षा लहान आहेस पण हुशार आहेस. मला तुझा अभिमान आहे.” टुटु चा मोठा भाऊ त्याला म्हणाला.

टुटु ने ऐकले व आपली कॉलर टाईट केली आणि म्हणाला,” मग, भाऊ कोणाचा आहे?” आणि दोघे हसायला लागले.

इतक्यात टुटुचे लक्ष खोलीतील कागद्यांच्या टुकड्यांकडे गेले. “दादा, हे काय रे? इतके बोलून ही तुझ्यात सुधारणा का होत नाही?” टुटु थोड्या रडक्या आवाजात बोलला.

“अरे, तू बस टिकिट रस्त्यावर टाकू नको म्हणून सूचना केल्या होत्या न. मी नाही टाकत आता.”

(सौजन्य: गुगल)

“हं, आता घरात येऊन टाकतो.” टुटु.

“हो, कारण ती बाई स्वच्छ करून घेते. आहे न तुझा दादा हुशार! ”

“वा दादा. बाहेर चा कचरा घरात आणून टाकायचा. काय हुशारी आहे न !”

“मला माहित नाही दादा. तू हा कचरा आताच्या आता उचल व केराच्या टोपलीत टाक.”

“असू दे रे. ती कामवाली बाई येईल थोड्या वेळाने. ”

“ते मला माहित नाही.”टुटु जिद्दी वर आला.

“बर बाबा. उचलतो.” दादाने शेवटी त्याचे ऐकले.

टुटु खुश झाला. व म्हणाला,” अरे दादा, घरी दारी आपण स्वच्छता ठेवली तर मन आनंदी राहतं. अभ्यासात मन लागतं.”

“हो देवा समजलं मला. आता नाही करणार चुकं” असे बोलून दादाने हात जोडले.

(171937)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐सुप्रभात💐

इतके आनंदी रहा कि तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी राहिल.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

दिवाळी पाडवा(१६१९३६)

नव गंध, नवा वास,
नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे..
तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा💐💐

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

💐शुभ दिपावली💐(१५१९३५)

नामाचे उटणे सर्वांगाला लावा
सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा
त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा
त्यागाने सर्व अंग कोरडे करा
आनंदाची नविन वस्रे परिधान करा
प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ
आणि सात्विक बनवा
अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा
स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा
॥ वसुबारसेची प्रथा॥🐄
॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏🏻
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻
हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच सदिच्छा ..☺🙏🏻

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

दिवाळीच्या शुभेच्छा…(१४१९३४)

🏮🏮🏮 सणांचा राजा दीपोत्सव आजपासून सुरु. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा चार पाच दिवस चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना

रविंद्र कोष्टी आणि परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणी समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻🌹🎊 🌹

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा